सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त रक्तदान शिबीर

पुणे – यंदा खिलारेवाडी तरुण मंडळ सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. या निमित्ताने मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. रक्तदानाचे महत्त्व जाणून हा उपक्रम या गणेश मंडळाने आयोजित केला होता. या शिबिरास कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून या शिबिरात रक्तदात्यांनी रक्तदान केले. मंडळाच्या वतीने प्रत्येक रक्तदात्यास भेट वस्तू व प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अजय मारणे यांनी रक्तदात्यांचे आभार मानले. या शिबिराचे संयोजन हनुमंत पवार यांनी केले. पी.एस.आय ब्लड बॅंक यांच्या सहकार्याने हे शिबीर झाले. दरवर्षी मंडळाच्या वतीने अनेक वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले जातात. यावर्षी देखील मंडळाच्या वतीने अनेक उपक्रम राबविले जाणार आहेत. ज्यामध्ये महिलांचे अथर्वशिर्ष पठण, भारुड, दिव्यांग महिलांचे आरोग्यविषयक व्याख्यान, भजन, छत्रपती शिवाजी महाराजांवरील व्याख्यान, कीर्तन, होम मिनिस्टर, अंध कलाकारांचा ऑर्केस्ट्रा आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)