‘सुवर्णपदक’ मार्गदर्शक आणि कुटुंबीयांना समर्पित : अमित

नवी दिल्ली: उझबेकिस्तानचा बॉक्‍सर हान्सबॉय डुझमोतोव्हला पराभूत करणे माझ्यापुढे आव्हान होते. कारण तो रिओ ऑलिम्पिक स्पर्धेचा सुवर्णपदक विजेता होता. त्याची चपळता आणि समोरच्या खेळाडूला कसे कैचित पकडायचे, याची रणनीती वाखानण्याजोगी आहे. तो अतिशय बुद्धिमान बॉक्‍सर आहे. मी आशियाई क्रीडा स्पर्धांपूर्वी दोनदा त्याचाविरुद्ध खेळलो होतो.

गेल्या वर्षी त्याने मला दोन महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये नमविले आहे. पण आज मी आणि माझे मार्गदर्शक सॅंटियागो निइवा यांनी विशेष डावपेच त्याच्याविरुद्ध खेळण्यासाठी आखले होते. त्या प्रमाणेच खेळून गेल्या दोन पराभवांचा बदला घेत तिरंगा फडकाविला. आज मी त्याच्यापेक्षा चपळ होतो आणि त्याच्या प्रत्येक हालचालीसाठी माझ्याकडे प्रतिडाव तयार होता. रिंगमध्ये उरताना मी आत्मविश्वासाने उरतलो.

कोणतेही दडपण मनावर येऊ दिले नाही. त्याच्याविरुद्ध लढतीपूर्वी मी आणि प्रशिक्षक सॅंटियागोंबरोबर त्याच्या काही सामन्याचे व्हिडीओ पहिले आणि त्यानुसार आम्ही त्याच्याविरुद्ध लढतीची रणनीती आखली होती. सुवर्णपदक जिंकल्याचा आनंद तर आहेच पण तो द्विगुणीत झाला आहे, कारण हान्सबॉयला पराभूत केल्याचे समाधान वेगळेच आहे. माझे सुवर्णपदक मी माझे कुटुंबीय व कोच सॅंटियागो यांना समर्पित करतो, असे अमितने सामन्यानंतर बोलताना सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)