सुलभ वाहतुकीकरीता राज्यात इंटलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम राबविणार

मुख्यमंत्र्यांची घोषणा


राज्यात 3 कोटी 28 लाख वाहने

मुंबई – राज्यातील वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे होणाछया अपघाताला आळा घालण्यासाठी आणि सुलभ वाहतूकीकरीता वाहतूक नियोजनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली जाणार आहे. त्यासाठी इंटलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमचा वापर मुंबईत करण्यात येणार असून त्यानंतर ही यंत्रणा राज्यभर राबविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.

परिवहन विभाग व वाहतूक पोलीस विभाग, मुंबई यांच्यावतीने आयोजित रस्ते सुरक्षा पंधरवड्याचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते व परिवहन मंत्री दिवाकर रावते, खासदार अरविंद सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली. गेल्या तीन वर्षात राज्यातील रस्ते अपघाताच्या प्रमाणात घट झाली आहे. मात्र, अपघात कमी करण्यासाठी सुधारणेस आणखी वाव आहे. परिवहन विभाग व वाहतूक पोलीसांनी आणखी प्रयत्न व जाणीव जागृती तसेच नवनवीन उपक्रम राबवावेत, अशी सूचना त्यांनी केली. सीसीटीव्ही नेटवर्क, ई- चलान या उपक्रमामुळे बेशिस्त वाहतुकीवर कारवाई करणे सोपे झाले. तसेच यामुळे लोकांमध्ये धाक बसून वाहतुकीच्या शिस्तीत वाढ झाली आह, असे सांगतानाच कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात बदल दिसून येत आह, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

ऑर्टिफिशियल इंटलिजन्सच्या माध्यमातून लोकांच्या सवयी, घडणारे गुन्हे, वाहतुक यांचा अभ्यास करून त्याचे विश्‍लेषण करून व्यवस्था उभी करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबईत प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत असलेल्या इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीममुळे रस्त्यांवरील वाहतुकीचा अभ्यास करण्यात येऊन त्याप्रमाणे वाहतुकीचे नियोजन करता येणार आहे. यामुळे वाहतूक कोंडी टाळणे, अपघात टाळणे शक्‍य होत आहे. ही यंत्रणा आता लवकरच संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे. इंटलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीममुळे वाहतूक सुधारण्यास अधिक मदत होईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)