सुलतान जोहोर चषक हॉकी स्पर्धा : भारताचा विद्यमान विजेत्या ऑस्ट्रेलियावर विजय 

जोहोर बारू (मलेशिया): भारतीय ज्युनियर पुरुष हॉकी संघाने बुधवारी विद्यमान विजेता ऑस्ट्रेलियाला 5-4 ने पराभूत करीत चौथा विजय मिळवतानाच सुलतान जोहोर चषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आपली जागा नक्‍की केली आहे.
या सामन्यात भारताने उत्कृस्ठ खेळाचे प्रदर्शन करताना ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर दबाव आणला. यात भारतीय आक्रमकांनी शानदार खेळ करताना ऑस्टेललियाच्या बचावफळीवर सातत्याने दबाव आणला. त्याचवेळी भारताच्या बचावफळीने मोक्‍याच्यावेळी खेळ उंचावत ऑस्ट्रेलियन संघाला गोल करण्यापासून वेळो वेळी रोखले त्यामुळे भारतीय संघाला विजय मिळवता आला.

या विजयाने भारत साखळी फेरीत आपल्या गटातून आघाडीवर राहिला आहे. भारताने सामन्यात वर्चस्व राखले. भारताने सामन्यात चांगली सुरुवात केली. परंतू सुरुवातीला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचा फायदा भारताला घेता आला नाही. मात्र, गुरसाहिबजीत सिंगने पाचव्या मिनिटाला मैदानी गोल करत भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पुढेही दबदबा कायम ठेवला. 11 व्या, 14 व्या आणि 15 व्या मिनिटाला गोल करत 4 -0 अशी आघाडी कायम ठेवली. हे गोल अनुक्रमे हसप्रीत सिंग, मनदीप मोर आणि विष्णुकांत सिंह यांनी केले. पहिल्या क्वार्टरमध्ये चार गोल केल्यावरही विद्यमान विजेत्या संघाला मोठा धक्का बसला.

-Ads-

भारतीय बचाव फळीने दुसऱ्या क्वार्टरमध्ये चांगला खेळ केला नाही. ऑस्ट्रेलियाच्या डॅमन स्टिफन्स याने 18 व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकवर गोल केला. त्यांच्याकडून होणारा हा पहिला गोल होता. डॅमन स्टिफन्स याने 35 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर दुसरा गोल केला. त्यांनी लवकरच तिसरा गोलही केला. शैलेंद्र लाकडा याने 43 व्या मिनिटाला भारताची आघाडी 5-3 अशी केली. भारतीय संघावर अखेरच्या क्षणी गोल वाचवण्यासाठी मोठा दबाव होता. त्यातच 59 व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाला पेनल्टी स्ट्रोक मिळाला. स्टिफन्स याने यावर गोल करण्यात कोणतीच चूक केली नाही. भारताने अखेरच्या क्षणी चांगला बचाव केला. आणि ऑस्ट्रेलियाला गोल करण्याची संधी दिली नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)