सुलतान जोहोर कप हॉकी स्पर्धा: भाताचा न्युझिलंडवर धडाकेबाज विजय 

जोहोर बाहरू (मलेशिया): भारताच्या ज्युनियर संघाने सुलतान जोहोर कप हॉकी स्पर्धेत न्यूझीलंडवर 7-1 अशी दणदणीत मात केली असून भारतीय संघाचा हा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय आहे. स्पर्धेच्या उद्घाटनाच्या दिवशी भारतीय संघाने यजमान मलेशिया संघावर 2-1ने मात केली होती. 
भारताकडून प्रभज्योतसिंग (6 मि.), शिलानंद लाक्रा (15, 43 मि.), हरमनजितसिंग (21 मि.), महंमद फराझ (23 मि.), अभिषेक (50 मि.) आणि कर्णधार मनदीप मोर (60 मि.) यांनी गोल केले, तर न्यूझीलंडकडून एकमेव गोल साम हिहाने (53 मि.) केला. गतवर्षी ब्रॉंझपदक मिळवणाऱ्या भारताने आक्रमक सुरुवात केली. सहाव्याच मिनिटाला प्रभज्योतने गोल करून न्यूझीलंडला बॅकफूटवर टाकले.
यानंतर या वर्षाच्या सुरुवातीला वरिष्ठ संघात प्रवेश केलेल्या शिलानंद लाक्राने गोल करून भारताची आघाडी वाढवली. न्यूझीलंडच्या खेळाडूंनी काही चांगल्या चाली रचल्या. मात्र, भारतीय खेळाडूंनी त्यांना गोल करण्याची संधी दिली नाही. यानंतर भारताकडून तीन मिनिटांच्या अंतरात पेनल्टी कॉर्नरवर दोन गोल झाले. त्यामुळे पूर्वार्धात भारताकडे 4-0 अशी आघाडी होती. उत्तरार्धात शिलानंदने वैयक्तिक दुसरा गोल केला, तर अभिषेक, मनदीपने भारताची आघाडी वाढवली. न्यूझीलंडकडून अखेरच्या सत्रात गोल झाला. भारताची आता 9 ऑक्‍टोबरला जपानविरुद्ध लढत होईल. 
तत्पूर्वी, स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात यजमान मलेशियावर 2-1 ने मात केली आहे. भारताकडून हरमनजीत सिंहने 12 व्या मिनीटाला तर शैलेंद्र लाक्राने 46 व्या मिनीटाला गोल केला. मलेशियाकडून मोहम्मद झैदीने 47 व्या मिनीटाला एकमेव गोल केला होता. सुरुवातीच्या सत्रात दोन्ही संघ एकमेकांना वरचढ होण्याची संधी देत नव्हते. मात्र दहाव्या मिनीटाला भारतीय खेळाडूंनी मलेशियाचा बचाव भेदण्यात यश मिळवलं, मात्र गोलकिपर ऍड्रीय अल्बर्टने भारताचं आक्रमण यशस्वीरित्या परतवून लावलं. मात्र 12 व्या मिनीटाला हरमनजीतने पासला योग्य दिशा देत भारताचा पहिला गोल केला.
दुसऱ्या सत्रात मलेशियाच्या खेळाडूंनी भारताला चांगली टक्कर दिली, मात्र गोल करण्यात त्यांना अपयश आलं. तिसऱ्या सत्रात दोन्ही संघांनी बचावात्मक पवित्रा आजमवल्यामुळे खेळाडूंना गोल करण्यात अडचणी आलेल्या पहायला मिळाल्या. मात्र 46 व्या मिनीटाला शैलेंद्र लाक्राने गोल करत भारताला सामन्यात 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. यापाठोपाठ मलेशियाच्या झैदीनेही एक गोल झळकावत सामन्यात पुनरागमन केलं. मात्र उर्वरित वेळात भारतीय बचावपटूंनी सुरेख बचाव करत मलेशियाच्या विजयाचे मनसुबे उधळून लावले. 
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)