सुरेश हावरे हे देवस्थानचे विश्‍वस्त आहेत कि मालक?

हिंदू जनजागृती समितीचा सवाल

सातारा – शिर्डी येथील श्री साई संस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी नुकतेच शासनाला सिंचन प्रकल्पाच्या कामांसाठी 500 कोटी रुपयांचे कर्ज दिले. या कर्जाला ना व्याज, ना मुदत, ना कशाची हमी. आधीच कर्जाच्या बोज्याखाली असलेल्या राज्याकडून हे कर्ज फिटण्याची अपेक्षा करणे, म्हणजे चमत्कारच मानावा लागेल. हे कर्ज नव्हे, तर 500 कोटींचे दानच हावरे यांनी शासनाच्या पदरात टाकले आहे.

-Ads-

शासनाच्या वशिल्यावर श्री साई संस्थान ट्रस्टचे विश्‍वस्त बनलेल्या हावरे यांना ट्रस्टचा पैसा हा काय स्वतःच्या मालकीचा वाटत आहे काय , असा प्रश्‍न हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी केला आहे. मंदिरांचे विश्‍वस्त “भक्त’ नसतील, तर देवनिधीची कशाप्रकारे लूट होते, याचे हे उत्तम उदाहरण आहे. देवनिधीची लूट हे महापाप असून ते लुटणाऱ्यांना फेडावेच लागेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)