सुरेश धस भाजपात; पंकजा मुंडे यांनी केले शिक्कामोर्तब

बीड – जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिल्याच्या कारणावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसने निलंबित केलेले नेते सुरेश धस यांच्या भाजपात प्रवेशाच्या चर्चा शहरात रंगल्या होत्या. यावर आता ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शिक्कामोर्तब केले आहे. मुंडे यांनी आष्टीत सुरेश धस यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या भाजप प्रवेशावरून होणाऱ्या चर्चांना पुर्णविराम दिला आहे.

जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिल्यामुळे सुरेश धस यांना राष्ट्रवादीने निलंबित केले होते. त्यानंतर लगेच त्यांच्या भाजप प्रवेशाच्या शहरात चर्चाही रेगू लागल्या होत्या.आष्टी येथे सुरेश धस यांनी कार्यकर्त्यांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला पंकजा मुंडेंनीही हजेरी लावली. सुरेश धस हे आज भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी दिवसभर चर्चा असतानाच पंकजा मुंडे यांनी त्यांच्या प्रवेशाची चिंता कार्यकर्त्यांनी करू नये असे सांगितले. दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन ज्येष्ठ नेत्यांची भाजपसोबत काम करण्याची तयारी असल्याची माहितीही पंकजा मुंडे यांनी यावेळी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)