सुरेश कलमाडी रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल

पुणे: माजी केंद्रीय मंत्री आणि पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांची प्रकृती अचानक बिघडल्याने  त्यांना रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सद्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

कलमाडी यांच्या मेंदुमध्ये रक्ताची गाठ झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान त्यांच्यावर रुबी हॉस्पिटलमध्ये सुरेश कलमाडींवर उपचार करण्यात येत आहेत.

सुरेश कलमाडी हे १९७८-१९८० महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. तसेच १९८२ ते १९९५ आणि १९९८ च्या कार्यकाळात ते राज्यसभेचे सदस्य राहिले आहेत. माजी प्रधानमंत्री पी.वी. नरसिंह राव यांच्या कार्यकाळात कलमाडी १९९५ ते ९६ पर्यंत रेल्वे मंत्री होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)