सुरेगावमध्ये सेंद्रिय शेती मार्गदर्शन शिबिर

संग्रहित छायाचित्र

बेलपिंपळगाव – नेवासा तालुक्‍यातील सुरेगाव गंगा येथे रेसिड्यू फ्री ऑरगॅनिक मिशन इंडिया यांच्या वतीने गुरुवारी कै. आबासाहेब शिंदे यांचे स्मरणार्थ सेंद्रिय शेती मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. यावेळी ज्ञानेश्‍वर साखर कारखान्याचे सरव्यवस्थापक काकासाहेब शिंदे यांनी या शिबिराचे आयोजन केले होते.

सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन करणे व रेसिड्यू फ्री ऑरगॅनिक गटाची नोंदणी करणे हा या शिबिराचा उद्देश होता. शिबिरात विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. सेंद्रिय शेती प्रमाणीकरण अधिकारी डॉ. प्रशांत नाईकवाडी यांनी संकीर्ण शेती, उत्पादित सेंद्रिय शेतीमालाची नोंदणी करून बाजारातील विक्री व्यवस्था याविषयी माहिती दिली. तर, सेंद्रिय शेती अभ्यासक राजेंद्र साबरे यांनी सेंद्रिय शेतीबाबतची संपूर्ण माहिती देऊन शेतकऱ्यांच्या शंका व प्रश्नांना उत्तरे दिली. देशी गाय व तिचे दूध, शेण, गोमूत्र यांचे शेतीसाठी होणारे फायदे याबाबतही यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी ज्ञानेश्‍वर कारखान्याचे संचालक राजेंद्र मते, रामभाऊ जगताप, ऍड. अशोक करडक, ऍड. गरड, ऍड. पिसाळ, ऍड. वैद्य, सुरेशनगरचे सरपंच पांडुरंग उभेदळ, हंडीनिमगावचे सरपंच अण्णासाहेब जावळे, सुरेगावचे सरपंच बद्रीनाथ शिंदे, सरपंच साहेबराव गारुळे, नरसिंह शिंदे, भुजंगराव शिंदे, रमेश ओस्तवाल, अशोक पोतदार यांच्यासह सुरेगाव परिसरातील शेतकरी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)