सुरेंद्र गडलिंग यांचे “सायबर लॉ’चे शिक्षण नाकारले

न्यायाधिश के. डी. वडणे यांचा आदेश : केलेला अर्ज फेटाळला

पुणे – एल्गार परिषदेप्रकरणी अटकेत असलेल्या व सध्या येरवडा कारागृहात असलेले वकील सुरेंद्र गडलिंग यांनी “सायबर लॉ’चे शिक्षण घेण्यासाठी केलेला अर्ज विशेष न्यायाधीश के. डी. वडणे यांनी फेटाळून लावला आहे.

गडलिंग यांनी त्याच्या अर्जात येरवडा कारागृह प्रशासनाला “सायबर लॉ’चे शिक्षण घेण्यासाठी परवानगी देण्याबाबत निर्देश देण्यासाठी अर्ज दाखल केला होता. परंतु, सुनावणीवेळी जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी त्यांच्या शिक्षण घेण्याला विरोध दर्शविला होता. त्यामध्ये त्यांनी सायबर कायद्याच्या शिक्षणासाठी परवानगी दिल्यास कारागृहातील वायफाय हॅक होवू शकते. येथील डेटा चोरीली जाऊ शकतो. तसेच शिक्षण घेण्याच्या बहाण्याने आतापर्यंत हाती न आलेला डेटा डिलीट करण्याची शक्‍यता आहे, असे त्यात नमूद करण्यात आले होते.

यापूर्वीम गडलिंग यांनी मुक्त विद्यापीठातून “सायबर लॉ’ची पदविकेचे शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु, कारागृह प्रशासनाने याबाबत विरोध दर्शविल्यानंतर मूलभूत हक्कावर गदा येत असल्याचे नमूद केले होते. दरम्यान, कारागृह प्रशासनाने येरवडा कारागृहामध्ये कला आणि वाणिज्य शाखेची पदवी घेण्याची सुविधा असून “सायबर लॉ’ची पदविका करण्यासाठी सुविधा उपलब्ध नसल्याचे म्हणणे मांडले.

दोन्ही पक्षाचा युक्तीवादानंतर न्यायालयाने दिल्ली मुक्त विद्यापीठाची पदविकेची सुविधा येरवडा कारागृहात उपलब्ध नाही. त्यासाठी इलेक्‍ट्रॉनिक साहित्य उदा. मोबाइल फोन, लॅपटॉप, इंटरनेटची सुविधा सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कारागृहात पुरविण्याची परवानगी नाही. गुन्ह्याचा तपास करताना तपास अधिकाऱ्यांनी काही इलेक्‍ट्रॉनिक वस्तू जप्त केल्या आहेत. हा गुन्हा करताना अशाच इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंचा उपयोग झाला आहे. गुन्ह्याचा तपास अजून सुरू आहे. त्यानुसार न्यायालयाने आपले मत व्यक्त करताना आरोपी डिजीटल डाटा करप्ट करण्याची शक्‍यता असल्याने शिक्षण घेण्यासंदर्भातील अर्ज फेटाळत असल्याचे आदेशात नमूद केले आहे.

कुटुंबाची पत्रे दिलेच नाहीत
पत्नीने आणि मुलाने पाठविलेली पत्रे कारागृह अधिकाऱ्यांनी मला न देता ती परत पाठविल्याची तक्रार न्यायालयाकडे केली. कारागृह प्रशासनाने असे का केले, असा प्रश्‍न गडलिंग यांनी उपस्थित केला. तसेच न्यायालयाकडे गडलिंग यांनी गरम कपडे हॅन्डग्लोज, वही आणि कलर पेन्सिलची मागणी केली. मात्र, पेन्सिल आणि वही देण्यास काही हरकत नसून गरम कपडे आणि हॅन्डग्लोज कारागृह प्रशासनाला विचारून द्यावे लागेल असा आक्षेप अॅड. उज्ज्वला पवार यांनी घेतला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)