सुरूर येथे जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन

सुरुर ः कार्यक्रमाच्या उद्‌घाटन प्रसंगी किसन वीर कारखाना संचालक प्रताप यादव व विविध मान्यवर (छाया : विनोद पोळ, कवठे.)

अभिषेक यादव मित्र समूह वाई तालुका यांचा उपक्रम
कवठे, दि. 12 (प्रतिनिधी) – सुरूर, ता. वाई येथील श्री शिवाजी विद्यालय सुरूरच्या मैदानावर जिल्हास्तरीय ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. नुकताच या स्पर्धांचा उद्घाटन समारंभ घेण्यात आला. अभिषेक यादव मित्र समूह वाई तालुका यांच्या वतीने सदर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये जिल्ह्यातील नामांकित संघांच्यामध्ये रंगतदार लढती होणार आहेत.
या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक 21,000 रुपये असून ते वाई पंचायत समिती सदस्य दीपक ननावरे व मयुरेश्वर येथील उद्योजक संतोष मोरे यांच्यातर्फे देण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकांचे पारितोषिक 15000 रुपयांचे असून भाजपाचे युवा नेते गणेश जाधव, गुळूंब व गुळूंबचे उपसरपंच सागर जाधव यांच्यावतीने देण्यात येणार आहे. तृतीय क्रमांकाचे पारितोषिक 10000 रुपयांचे असून ते कवठे येथील युवा उद्योजक विकास डेरे व वडूज येथील कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष रोहन राऊत यांच्यावतीने देण्यात येणार असून यातील उत्तेजनार्थ पारितोषिक 3001 रुपयांचे असून ते कवठे येथील भोजराज देवकर यांच्या वतीने देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त विविध 1001 रुपयांची पारितोषिके विजय कदम, पै. वैभव इथापे, प्रताप यादव, मोंजीनिस केक शॉपी वाई, ओझर्डे सरपंच संदीप पिसाळ, अभिजित लोखंडे व मदन चव्हाण यांच्या वतीने देण्यात येणार आहेत.
सुरुर येथे होत असलेल्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी 35 संघांची नोंदणी झाली असून उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून किसन वीर कारखान्याचे संचालक प्रताप यादव, वाई पैलवान ग्रुपचे सागर जाधव, शिवप्रतिष्ठानवाईचे आप्पा मालुसरे, चांदक उपसरपंच राजेंद्र खामकर, गुळूंब उपसरपंच सागर जाधव, शिरगावचे उपसरपंच अमर गायकवाड, धोम पुनर्वसन उपसरपंच, यादव सर, प्रकाश सोनावणे सर, तसेच वाई, सुरूर, केंजळ, चांदक, गुळूंब, पांडे ओझर्डे व देगाव येथील युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)