सुरक्षित प्रवासाच्या व्यवस्थेसाठी उद्योगांनी पुढाकार घ्यावा

नवी दिल्ली -सर्व संबंधितांच्या सक्रिय सहकार्यामुळेच देशातल्या रस्ते अपघातांची आणि अपघातातल्या बळींची संख्या कमी होईल, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नीतीन गडकरी यांनी म्हटले आहे. रस्ते सुरक्षा या विषयावरच्या उद्योग क्षेत्रासमवेत आयोजित कार्यशाळेचे उद्‌घाटन करतांना ते आज नवी दिल्लीत बोलत होते.

भारतात, रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ही जगातली मोठी संख्या आहे, असे सांगून त्यांनी याबद्दल चिंता व्यक्त केली.ही संख्या निम्म्यावर आणण्याची उद्योग धुरिणांनी आणि सर्व संबंधितांनी प्रतिज्ञा करावी, असे आवाहन त्यांनी केले. गेल्या काही वर्षात सरकार ऑटो मोबाईल उत्पादक, स्वयंसेवी संस्था उद्योगजगत यांच्या एकत्रित प्रयत्नाने रस्ते अपघातातल्या बळींची संख्या थोडी कमी झाली आहे.

मात्र यासंदर्भात अजून बरेच काम बाकी आहे, असे गडकरी म्हणाले. रस्ते सुरक्षा आणि वाहन सुरक्षा वाढविण्यासाठी शिक्षण अंमलबजावणी,आपत्कालीन मदत, रस्ते बांधणी या चार मुद्यांवर आपल्या मंत्रालयाने लक्ष केंद्रित केल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)