सुरक्षित दिवाळीसाठी पिंपरीत पथनाट्य

पिंपरी – येथील नवमहाराष्ट्र विद्यालयातील कला-क्रीडा सांस्कृतिक मंच याठिकाणी सुरक्षित दिवाळी साजरी करताना फटाके वाजविताना घ्यायची काळजी याबाबत सेफ किड्‌स फाउंडेशन मार्फत प्रबोधन करुन पथनाटय सादर करण्यात आले.
याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य उत्तम पाटील, पर्यवेक्षक शरद परदेशी आणि सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी सेफ किड्‌स फाउंडेशनतर्फे 20 जणांची टीम विद्यालयात आली होती. त्यांनी फटाके वाजविल्यामुळे प्रदूषण वाढते, किंवा काही अपघात होतात, भाजते, आग लागू शकते, हे टाळण्यासाठी प्रबोधन केले.
भाजले असता थंड पाण्यात हात धरावा अथवा नळाखाली हात धरावा. फटाके वाजविताना कोणती काळजी घ्यावी, सुती घट्ट कपडे घालावेत, घरातील वडिलधारी मंडळी बरोबर असावीत, फटाके मोकळ्या मैदानात वाजवावेत आदी माहिती सांगितली. तसेच रुग्णवाहिका आणि आग्निशामन दलाचा संपर्क क्रमांक देण्यात आला. फटाके वाजविताना घ्यायची काळजी या विषयी पत्रकांचे वाटप करण्यात आले. कार्यशाळेचे संयोजन निता शेटे यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)