सुरक्षा रक्षकाला दोघांची मारहाण

पिंपरी – उद्यानात मेंढ्या आणण्यास मनाई करणाऱ्या महापालिकेच्या सुरक्षा रक्षकाला दोन जणांनी काठीने बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास चिंचवडगावातील जिजाऊ पर्यटन केंद्रात घडली.

अनिल नारायण जगताप (वय-47, रा. भीमनगर, चिंचवड) असे मारहाण झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. जगताप हे चिंचवड येथील महापालिकेच्या जिजाऊ पर्यटन केंद्रात सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. शनिवारी (दि. 10) दुपारी साडेबाराच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे कामावर होते. यावेळी दोनजण मेंढ्या घेऊन उद्यानात आले. जगताप यांनी त्यांना मेंढ्या उद्यानात आणण्यास मनाई केली. त्यामुळे संतापलेल्या दोन आरोपींनी जगताप यांना काठीने मारहाण करत जखमी केले. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)