सुरक्षा रक्षकाने केले घर साफ

-44 लाख, 35 हजारांची घरफोडी; रिव्हॉल्वरही चोरले
-देवदर्शनाला गेले होते कुटुंब

पुणे – देवदर्शनाला कुटुंब गेल्यावर सुरक्षा रक्षकाने साथीदाराच्या मदतीने घरफोडी करत तब्बल 44 लाख, 35 हजारांचा ऐवज चोरला. ही घटना कर्वेनगर येथील स्वस्तिक कॉलनीतील लबडे रेसिडन्सीमध्ये घडली. चोरीला गेलेल्यामध्ये 1,735 ग्रॅम सोने व 1000 ग्रॅम चांदीचा समावेश आहे. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात सुरक्षा रक्षक आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी प्रथमेश लबडे (वय 27) यांचा वडिलोपार्जित बांधकाम व्यवसाय आहे. त्यांचे चार मजली घर असून त्यातील दोन मजल्यावर ते राहतात. आईवडील, पत्नी आणि भाऊ असे एकत्र कुटुंब 3 जानेवारी रोजी देवदर्शनाला गेले होते. ते 5 जानेवारी रोजी घरी परतले. तेव्हा त्यांना घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले आढळले. त्यांनी घरातील कपाटाची पाहणी केली असता कपाटातील एक परवानाधारक पिस्तूल, कॅनन कंपनीचा कॅमेरा आणि सोन्याचांदीचे दागिने, असा 44 लाख 35 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे आढळले. त्यांनी घरासाठी एक सुरक्षा रक्षक ठेवला आहे. तो पत्नीसह इमारतीच्याच आवारात राहतो. मात्र, हा सुरक्षा रक्षक पत्नीसह घरसोडून गेल्याचे आढळले.

यासंदर्भात पोलिसांनी माहिती देताना सांगितले, फिर्यादीचे कुटुंब देवदर्शनासाठी अक्‍कलकोट आदी परिसरात गेले होते. तेव्हा त्यांच्या टॉयलेटची खिडकी उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. यानंतर बेडरूमच्या कपाटातील किमती ऐवज चोरून नेला. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक खांडेकर करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)