सुरक्षा रक्षकाचा धारदार शस्त्राने खून

सुरक्षा रक्षकाचा धारदार शस्त्राने खून ; फरफटत नेऊन मृतदेह टाकला शेडमध्ये
पुणे,दि.28(प्रतिनिधी)- सुरक्षा रक्षकाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. यानंतर त्याचा मृतदेह फरफटत नेऊन कॅण्टीनमधील शेडमध्ये टाकण्यात आला. ही घटना कात्रज येथे रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास उघडकीस आली.
अरिब कासम खान(42,रा.भिलारवाडी) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार कात्रज येथे रतन मोटर्स येथे अरिब खान हा सुरक्षा रक्षकाचे काम करतो. तो रात्री ड्युटीवर असताना त्याचा कोणीतरी धारदार शस्त्राने वार करुन खून केला. यानंतर घटना लपवण्यासाठी त्याचा मृतदेह फरफटत नेऊन शेजारील कॅण्टीनच्या शेडमध्ये टाकून दिला. ही घटना दुपारी साडेअकराच्या सुमारास तेथील नागरिकांच्या लक्षात आली. यानंतर त्यांनी भारती विद्यापीठ पोलिसांना याची खबर दिली. घटनास्थळी तातडीने वरिष्ठ पोलिस अधिकारी दाखल झाले. डॉक स्कॉडचीही मदत घेण्यात आली. याप्रकरणी सायंकाळी उशीरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)