सुरक्षा रक्षकांच्या पैशांवर पदाधिकाऱ्यांचा डल्ला

पिंपरी – तास न तास उभे राहून आपली ड्युटी चोख बजावणाऱ्या सुरक्षारक्षकांच्या हक्‍काच्या पगारावर देखील संस्थांचे पदाधिकारी डल्ला मारत असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. या प्रकरणी सुजाण नागरीक संघाने सुरक्षा रक्षकांच्या हक्‍कासाठी आवाज उठवला आहे.

सुरक्षारक्षकांच्या नावावर मिळणारे पैसे संबंधित संस्थेचे पदाधिकारी काढून घेत आहेत. अशा संस्थांची चौकशी करुन त्यांना काळ्या यादीत समाविष्ठ करण्याची मागणी ही सुजाण नागरीक संघाच्या वतीने आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्याकडे करण्यात आली आहे. सुजान नागरीक मंचाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेतील सुरक्षा विभागात 1200 सुरक्षा रक्षक तीन ते चार संस्थांमार्फत पुरविण्यात येत आहेत. त्या सुरक्षा रक्षकांना दरमहा 17000 ते 17500 रूपये पगार गार्ड बोर्ड सेंटरतर्फे पुरविण्यात येतो. परंतु पिंपरी चिंचवड महापालिका सेवेमध्ये जे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात त्यांना मात्र संस्थेमार्फत 7000 ते 6000 रूपयेच पगार म्हणून दिले जातात.

सही सतरा हजारांवर, हाती सात हजार
सुरक्षा रक्षकांच्या पगाराच्या दिवशी 17000 रूपयांच्या चलनावर (बॅंक) त्यांची सही घेतली जाते आणि त्या सुरक्षा रक्षकांना बॅंकेतून पैसे काढण्याच्या रांगेत उभे केले जाते. तेव्हा त्यांच्या सोबत संबंधित संस्थेचे सुपरवायजर असतात. सुरक्षारक्षक आपल्या हक्‍काचे पैसे घेऊन बाहेर आला की, संबधित संस्थेचे पदाधिकारी त्यांच्याकडून दहा हजार रूपये काढून घेतात, व फक्‍त सात हजार रूपयेच त्याच्या हातावर टेकवतात. पैशांवर डल्ला मारला जात असल्याची ओरड सध्या सुरु आहे. तसेच सुरक्षा रक्षक जेंव्हा पालिकेत रूजू होतात. तेव्हा त्यांच्या गणवेशाची जबाबदारी संबंधित संस्थांची असते, मात्र त्या गणवेशाचे पैसेही सुरक्षा रक्षकांकडून घेतले जातात. त्याचबरोबर सुरक्षा विभागामध्ये काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकाच्या रक्षणाचे साधन पुरवण्याची जबाबदारी त्या संस्थांची असते. परंतु कोणतेच साधन ह्या संस्थेमार्फत पुरविल्या जात नसल्याची माहिती सुजाण नागरीक संघाचे अध्यक्ष सुंदर कांबळे यांनी दिली.

काळ्या यादीत समाविष्ट करण्याची मागणी
या सर्व बाबींकडे लक्ष केंद्रित केल्यावर त्या सुरक्षा रक्षकांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होत आहे. हे थांबविण्यासाठी ज्या संस्थाना ही कामे दिली आहेत. त्यांची चौकशी करून त्यांना काळ्या यादीत समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. तसे न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा सुजाण नागरीक संघटनेने दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)