संग्रहित छायाचित्र
श्रीनगर: शुक्रवार रात्री पासून सुरक्षा दलांनी हाती घेतलेल्या शोध मोहिमेला मोठे यश आले असून, सुरक्षा दलांनी आज लष्कर-ऐ-ताईबा आणि हिजबुल मुजाहिद्दीन या आतंकवादी संघटनेच्या पाच अतिरेक्यांना कंठस्नान घातले आहे.
याबाबत पोलिसांकडून माहिती देताना पोलीस प्रवक्त्याने सांगितले की “सुरक्षा दलांना दक्षिण काश्मीरच्या कुलघाम जिल्ह्यातील काझीगंदच्या चवगाम भागामध्ये काही अतिरेकी असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर सुरक्षा दलांनी शुक्रवारी रात्रीपासूनच शोध मोहीम चालू केली होती.”
“शोध मोहीम सुरु असताना लपून बसलेल्या अतिरेक्यांनी सुरक्षा दलाच्या सैनिकांवर गोळीबार सुरु केला, परंतु सुरक्षा दलांकडून प्रथम सामान्य नागरिकांना घटनास्थळावरून हटविण्यात आले व त्यानंतर अतिरेक्यांना प्रतिउत्तर देण्यात आले.” अशी माहिती देखील प्रवक्त्याने दिली.
सुरक्षा दलाकडून ठार करण्यात आलेल्या अतिरेक्यांची नावे गुलझार अहमद पद्दर, फैसल अहमद राथेर, झाहीद अहमद मीर, मसरूर मौलवी, आणि झहूर अहमद लोन अशी आहेत.
सुरक्षा दलांकडून ५ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आल्यानंतर घटनास्थळी काही तरुणांनी दगडफेक केली, यामध्ये एका नागरिकाचा बळी गेला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)