सुरक्षा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार

चिंचवड ः यंदाचे नॅशनल सेफ्टी एक्‍सलन्स ऍवार्डस्‌ 2018 प्राप्त करणारे विविध कंपन्यांचे सुरक्षा अधिकारी.

सांगवी, (वार्ताहर) – सुरक्षा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विविध आस्थापनांमधील सुरक्षा अधिकाऱ्यांना नॅशनल सेफ्टी एक्‍सलन्स अवॉर्डस्‌ देवून गौरविण्यात आले. आरुष फायर सिस्टीमस्‌ प्रा. लि., नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंट आणि एस.एम.ई.चेंबर ऑफ इंडिया यांच्या संयुक्‍त विद्यमाने नॅशनल सेफ्टी एक्‍सलन्स ऍवार्डस्‌ 2018 च्या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन यशस्वी इंस्टिट्यूट चिंचवड येथे करण्यात आले होते.

सुरक्षेबद्दल जनजागृती व्हावी, सुरक्षा क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या एकत्रीकरणासाठी, तसेच त्यांनी सुरक्षा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्या सुरक्षा अधिकाऱ्यांचे मनोबल उंचाविण्यासाठी हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.

या पुरस्कारासाठी पुण्यातील तसेच महाराष्ट्राबाहेरील विविध आस्थापनांमधील सुरक्षा अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. पर्यावरण सुरक्षा, औद्योगिक सुरक्षा आणि अग्नि सुरक्षा अशा तीनही विभागामध्ये उल्लेखनीय काम केलेल्या फ्लॅश इलेक्‍ट्रॉनिक्‍स प्रा. लि. चे सेफ्टी ऑफिसर नंदू लोखंडे, कल्याणी कारपेंटर स्पेशल स्टील लि. चे सेफ्टी ऑफिसर आत्माराम पाटील, हिंदुस्थान कोकाकोला कंपनीचे ई.एच.एस. मॅनेजर अनिल बडगुजर, कर्मवीर अंकुशराव टोपे, सहकारी साखर कारखान्याचे सेफ्टी व सिक्‍युरिटी ऑफिसर फारूक डुंगे, गोदरेज प्रॉपर्टीज लि. चे सेफ्टी ऑफिसर संतोष जगताप आणि रहेजा प्रॉपर्टीजचे सेफ्टी ऑफिसर राहुल पवार यांना गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भारत फोर्ज लि. चे व्हाईस प्रेसिडेंट एच.आर. डॉ. एस.व्ही. भावे यांनी सुरक्षाविषयक जनजागृती वाढावी यासाठी स्वच्छता अभियानाच्या धर्तीवर संपूर्ण भारतभर सुरक्षा अभियान राबविणे ही काळाची गरज आहे, असे मत व्यक्त केले. यावेळी आरूष फायर सिस्टीम्सचे संचालक अर्जुन जाधव यांनी औद्योगिक सुरक्षा तसेच अग्नि सुरक्षेबद्दल सरकारने काही योजना आणाव्यात आणि त्या सोबत प्रत्येकाने सुरक्षा संबंधी माहितीचा प्रचार व प्रसारासाठी हातभार लावावा अशी अपेक्षा व्यक्त केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)