सुरक्षा अभियानात रिक्षाचालकांना रस्तासुरक्षेची प्रतिज्ञा

पुणे – वाहन अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान सुरू आहे. यामध्ये विविध कार्यक्रमांतर्गत नागरिकांना नियमांविषयी माहिती देण्यात येत आहे. गुरुवारी (दि.26) प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने शहरात वाहनांच्या ध्वनीप्रदुषण, हवाप्रदुषण तपासणी तसेच रिक्षाचालकांना रस्ता सुरक्षेची प्रतिज्ञा देण्यात आली.

प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रशेखर चव्हाण, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी स्नेहा मेडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम घेण्यात आले.

-Ads-

अपघात टाळण्यासाठी परिवहन विभागातर्फे रस्ता सुरक्षा अभियान सुरू करण्यात आले आहे. यात विविध कार्यक्रमांतर्गत नागरिकांना नियमांविषयी माहिती देण्यात येत आहे. वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या चालकांना प्रोत्साहन दिले जात आहे. परिवहन विभागतर्फे गुरुवारी सकाळी परिवहन कार्यालयात शिकाऊ लायसन्स काढण्यासाठी येणाऱ्यांना हेल्मेटबाबत जनजागृती करण्यात आली. तर, सकाळच्या सत्रात फुलेनगर येथील कार्यालयात 80 ते 90 रिक्षाचालकांना रस्ते सुरक्षेविषयीची प्रतिज्ञा देण्यात आली. नियमांचे पालन करून रिक्षा चालवणे, प्रवाशांशी व्यवस्थित वागणे आदींवर चर्चा झाली. यावेळी मोटार वाहन निरीक्षक विवेक गोसावी यांच्यासह आदींनी रिक्षाचालकांना मार्गदर्शन केले. सोलापूर हायवे-हडपसर रोडवरून येणाऱ्या वाहनांना अडवून वायुप्रदुषण, ध्वनीप्रदुषण आदींची तपासणी करण्यात आली. भरारी पथकातील मोटार वाहन निरीक्षक शरद देशमुख, भालचंद्र कुलकर्णी यांच्यासह इतरांनी ही मोहीम राबवली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)