सुरक्षारक्षकाच्या कुटुंबीयांना 18 लाख मिळाले

पुणे – अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या सुरक्षारक्षकाच्या पत्नीला शनिवारी झालेल्या महालोकअदालतमध्ये 18 लाखांची नुकसानभरपाई मिळाली. हा दावा मोटार अपघात न्यायाधिकरणाचे प्रमुख सदस्य, जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस. एम. मेनजोगे, सदस्य ऍड. अतुल गुंजाळ यांच्या पॅनलने निकाली काढला. ही घटना दि. 25 नोव्हेंबर 2016 रोजी घडली.

अनिल बापूराव गायकवाड हे फलटणवरून पुण्याकडे दुचाकीवरुन येत होते. त्यावेळी विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येत असलेल्या ट्रकने त्यांना धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी गायकवाड हे 26 वर्षाचे होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ते सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. त्यांना दरमहा अकरा हजार रुपये पगार होता. त्यांच्या पत्नीने मोटार अपघात न्यायधिकरणाकडे नुकसनाभरपाई मिळावी, म्हणून दावा दाखल केला होता.

बजाज अलायन्झविरुद्ध त्यांनी दावा दाखल केला होता. महालोकअदालतमध्ये त्यांचा दावा निकाली काढण्यासाठी ठेवण्यात आला होता. अर्जदार गायकवाड यांच्यातर्फे ऍड. सुनीता नवले यांनी कामकाज पाहिले. तर बजाज अलायन्झतर्फे ऍड. वागदरीकर यांनी काम पाहिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)