सुरक्षाक्षकच निघाले चोर

लाखांचे स्पेअर चोरले : चार महिन्यांनी जेरबंद करण्यात चाकण पोलिसांना यश

चाकण-चाकण औद्योगिक वसाहतीमधील खालुंब्रे (ता. खेड) येथील फेस 2मध्ये असणाऱ्या ऑटो कॉम कार्पोरेशन पानसे लिमिटेड या कंपनीच्या स्टोअर रूममधून कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी कंपनीचे उघड्या शटरमधून आत प्रवेश करत कंपनीतील सुमारे 23 लाख 99 हजार 273 रुपये किंमतीचे प्रकारचे मोटरसायकलचे स्पेअर पार्ट चोरून नेले होते. याबाबत चाकण पोलिसांनी दोन सुरक्षा रक्षकांना ताब्यात घेतले आहे.
24 जून ते 22 जुलैच्या दरम्यान चाकण औद्योगिक वसाहतीतील क्रमांक दोन मधील खालुंब्रे येथील ऑटोकॉम कॉर्पोरेशन पानसे लिमिटेड या कंपनीच्या स्टोअरमधून मोटरसायकलचे पार्ट चोरून नेल्याची घटना घडली होती. याबाबतची फिर्याद नित्यानंद बाळकृष्ण पानसे यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिली होती. याबाबतच्या गुन्ह्याच्या तपासकामी चाकण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विक्रम पासलकर यांना मिळालेल्या माहितीनुसार मिलिंद संपतराव चव्हाण, राजेंद्र पांडुरंग डवले हे दोघे सेंट्रल ह्यूमन रिसोर्सेस या सिक्‍युरिटी मेनफोर्स कार्पोरेशन या कंपनीमध्ये तीन महिने सुरक्षारक्षक म्हणून काम करीत होते. त्या दरम्यान त्यांनी हा गुन्हा केला. त्यांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून दोन लाख 97 हजार 130 रुपये किंमतीचे मोटरसायकलच्या वायरिंगचे व शॉकऍबसॉर्बर्स हे चोरीचे सामान जप्त करण्यात आले आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्रम पासलकर संजय निलपत्रेवर, पोलीस हवालदार शिवानंद स्वामी, सुरेश शिंदे, संपत मुळे, प्रदीप राणे, अनिल गोरड, प्रशांत वहिल व सहकारी करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)