सुमीत सपकाळ याची जिल्हास्तरावर निवड

पानशेत – मांजरी (ता. हवली) येथील श्री छत्रपती संकुल येथे घेण्यात आलेल्या हवेली तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत सुमीत किरण सपकाळ (रा. खानापूर, ता. हवली) याने यश संपादन केले आहे. जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्‍त विद्यमानाने आयोजित केल्या होत्या. यात अनेक शाळांसह खेळाडूंनी सहभाग घेतला होता. खानापूर येथील महात्मा गांधी विद्यालयाततील सुमीत सपकाळ याची 49 वजन गटातून स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. याबद्‌दल सुमीत सपकाळचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. सुमीतला क्रीडा शिक्षक भीमराव आदलिंग, बाळासाहेब रुपनवर, शशीकांत जाधव यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तर, सुमीत सपकाळ यांचे प्राचार्य व्ही. व्ही. जगताप यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)