सुमित वाघमारे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक

बीड : बीडमध्ये काही दिवसापूर्वी माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली होती. सुमित वाघमारे या तरुणाचा भररस्त्यात निर्घृणपणे खून करण्यात आला. ही सर्व घटना उपस्थित जमाव पाहत असताना सुद्धा कोणीही त्याच्या मदतीला धावून आले नाही. सुमितची पत्नी हा सर्व प्रकार डोळ्यांनी पाहत होती, जमावाला मदतीची विनवणी करत होती. मात्र कोणीही तिच्या मदतीला आले नसल्याने सर्व स्तरातून आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते.

आदित्य इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षात शिकत असलेला सुमित वाघमारे आपल्या शिक्षणासाठी बीड शहरात मावशीकडे राहत होता. यातच महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या भाग्यश्रीसोबत सुमितचे प्रेमसंबंध जुळले. दोघांच्याही कुटुंबियांचा त्यांच्या लग्नाला विरोध असल्याने घरच्यांचा विरोध झुगारून भाग्यश्री आणि सुमितने लग्न केलं. प्रेमविवाह केल्याने बालाजी लांडगे दिवसाढवळ्या भररस्त्यात सुमित वाघमारेची हत्या करून आपल्या सख्या बहिणीचे कुंकू पुसून फरार झाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सुमित-भाग्यश्रीने लग्न केल्याचा राग मनात ठेवून भाग्यश्रीचा भाऊ बालाजी लांडगेने त्याच्या मित्र संकेत वाघच्या साथीने सुमित वाघमारेची हत्या केली. या खूनाचा कट रचणारा कृष्णा क्षीरसागर (रा.बीड) याला बीड पोलिसांनी काल अटक केल्यानंतर तपासाला गती आली. मुख्य आरोपी बालाजी लांडगे आणि संकेत वाघ या दोन नराधमांना पाच दिवसांनंतर पोलिसांनी अकोला परिसरातून अटक केली अशी माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)