सुमित आणि निखत यांना बॉक्‍सिंगमध्ये सुवर्णपदक

नवी दिल्ली  – सर्बीया येथील बेलाग्रेड येथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय बॉक्‍सिंग स्पर्धेत भारताच्या सुमित सांगवानने 91 किलो वजनी गटात तर निखत झरिनने 51 किलो वजनी गटात आपापल्य प्रतिस्पर्ध्यांना हरवत सुवर्णपदकाची कमाई केली.

स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी झालेल्या सामन्यांमध्ये 91 किलो वजनी गटात दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या सुमित सांगवानने विजय मिळवला .सुमितने पुनरागमनानंतरची आपली विजयी लय कायम ठेवत सामन्याच्या सुरुवाती पासुनच कॅसिलो टोरेसया आपल्या प्रतिस्पर्ध्यावर नियंत्रण मिळवले होते. सामन्यात त्याने टोरेसला 5-0 असे हरवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. सुमितने यापुर्वी आशियायी स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली होती.तर कनिष्ठ गटाचे विजेतेपद आपल्या नावे केलेल्या निखत झरिनने 51 किलो वजनी गटात ग्रीसच्या ऐकातेरीनीचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला.

सामन्याच्या पहिल्याच मिनिटापासून निखतने वर्चस्व गाजवले.त्याने ऐकातेरीनीला बचावाची संधीच दिली नाही त्या मुळे त्याने हा सामना एकतर्फी जिंकत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.तत्पुर्वी, 49 किलो वजनी गटात भारताच्या हिमांशु शर्माने अल्जेरीयाच्या मोहम्मद टोउरेगचा 5-0 असा एकतर्फी पराभव करत स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक आपल्या नावे केले होते. भारताने या स्पर्धेत तीन सुवर्ण, पाच रौप्य आणि पाच कांस्यपदक कमावले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)