सुमारे आठशे बेवारस रुग्णांवर मोफत अंत्यसंस्कार

पिंपरी – समाजात मानसिक, शारिरिक आजारामुळे एकाकी होऊन इतरत्र रस्त्याने भटकत असलेले बेवारस लोक आपण पाहतो. या लोकांची कुटुंब, मित्र, नातेवाईक किंबहुना समाजापासून ताटातूट झालेली असते. मात्र, ते समाजाचे एक घटक असतात. या लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएमएच) व “रियल लाईफ रियल पीपल’ या संस्थेतर्फे गेल्या आठ वर्षापासून एक लाखाहून अधिक बेवारस लोकांचे पुनर्वसन केले आहे. तसेच, संस्थेतर्फे आठशेहून अधिक बेवारस रुग्णांवर मोफत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

आजाराने ग्रस्त असलेली, कित्येक दिवसापासून उपाशी, शेवटच्या घटका मोजत असलेले अनेक लोक इतरत्र फिरताना आढळून येतात. या लोकांना पोलीस, काही सामाजिक संस्था वायसीएम रुग्णालयात आणून सोडतात. मात्र, रुग्णालय व रियल लाईफ रियल पीपल (आरएलआरपी) संस्थेतर्फे बेवारस रुग्णांचे केस पेपर काढण्यापासून त्या व्यक्तींचे पुनर्वसन करण्यापर्यतचे काम मोफत केले जाते. रुग्णांना ऍडमिट केल्यानंतर औषधे, जेवण, फळे आदी गोष्टी देऊन त्यांच्यावर उपचार करुन देखरेख ठेवतात. बेवारस रुग्ण पूर्णपणे बरा होईपर्यत दवाखान्यात ठेवला जातो. एखाद्या रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यास त्यांच्यावर अत्यंसस्कार करण्याची जबाबदारी रुग्णालय व संस्था उचलते. रुग्णावर देखभाल करुन त्यांचे पुनर्वसन करणारी “रियल लाईफ रियल पीपल’ संस्थेची स्थापना 2010 मध्ये करण्यात आली. गेल्या आठ वर्षापासून अखंडीतपणे बेवारस रुग्णांना सेवा देण्याचे काम सुरु आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“”प्रत्येक बेवारस रुग्णांवर मोफत उपचार करुन त्यांचे पुनर्वसन केल्याने जगण्याची नवी दिशा मिळते. समाजात अनेक गोर-गरीब रुग्ण असल्याने त्यांना मदत करण्याचे कर्तव्य पार पाडले जाते,” अशी माहिती रुग्णालयातील वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते महादेव बोत्रे यांनी सांगितली.

बेवारस, निराधार रुग्णांना आधार देण्याचे काम केले जाते. रुग्णालयात रोज चार ते पाच रुग्ण दाखल होत असून त्यांची जबाबदारी रुग्णालय आणि संस्थेतर्फे उचलली जाते. जुन्नर भागातून अनेक आदिवासी लोकांना आजपर्यत मदत करण्यात आली आहे. बेवारस व्यक्ती बस स्थानक, रेल्वे स्थानक तसेच रस्त्याकडेला सापडत असून अशा व्यक्तींना जगण्याची नवी ऊर्मी देण्याचे काम केले जाते. या लोकांचे उपचारानंतर महिला आश्रम, अनाथ आश्रमात पुनर्वसन केले जाते.
– एम. ए. हुसेन, संस्थापक, रियल लाईफ रियल पीपल.

रुग्णालयात शहरातून मोठ्या संख्येने बेवारस रुग्ण दाखल होतात. या रुग्णांना योग्य उपचार करुन त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी घेतली जाते. बेवारस, निराधार रुग्णांजवळ पैसे नसल्याने मोफत उपचार केले जातात. तसेच, या रुग्णांना आधार देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जातात.
शंकर जाधव, उपअधीक्षक, वायसीएम रुग्णालय.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)