सुभाष देशमुखांच्या अडचणीत वाढ… 

– लोकमंगलची खाती गोठवण्याचे सेबीचे आदेश 
– पत्नीसह सात जणांना बजावली नोटीस 

मुंबई  – राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशमुख यांच्या लोकमंगल ऍग्रो इंडस्ट्रिज लिमिटेड कंपनीची खाती गोठवण्याचे आदेश सेबीने दिले आहेत. सेबीने देशमुख यांच्या पत्नीसह सात जणांना ही नोटीस बजावली आहे. सेबीच्या या नोटिशीमुळे कंपनीच्या आणि संबंधित संचालकांच्या खात्यांतून कोणतीही रक्कम काढता येणार नाही.

सुभाष देशमुख यांच्या लोकमंगलमधील गैरव्यवहाराबाबत विधिमंडळाच्या अधिवेशनातही विरोधकांनी मुद्दा उपस्थित केला होता. मात्र सरकारने या मुद्‌द्‌याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले होते. आता सेबीने याप्रकरणी खाती गोठवण्याचे आदेश देत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना चांगलाच दणका दिला आहे. राज्यातील गुंतवणुकदारांचे 75 कोटी रुपये परत करण्याचे सेबीने दिलेल्या आदेशांचे लोकमंगलने पालन केले न केल्याने लोकमंगलचे डिमॅट खाते आणि म्युच्युअल फंडाची खाती गोठवण्याचे आदेश सेबीने दिले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याआधी सेबीने 16 मे 2018 रोजी गुंतवणुकदारांचे 75 कोटी रुपये 3 महिन्यात परत करण्याचे आदेश सेबीने दिले होते. मात्र गेल्या सहा महिन्यांत लोकमंगलने सेबीच्या आदेशाला कोणतेही उत्तर दिले नाही. त्यामुळे त्या आदेशांचे पालन संस्थेकडून झाले नसल्याचे कारण देत सेबीने खाती गोठवण्याची ही नोटीस बजावली.

लोकमंगल ऍग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीबरोबरच, नोटीसमध्ये देशमुख यांच्या पत्नी स्मिता देशमुख, वैजनाथ लातूरे, औदुंबर देशमुख,शहाजी पवार, गुर्राना तेली, महेश देशमुख, पराग पाटील यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. सेबीकडून पुढील तीन महिन्यांत आदेश निर्गमित होत नाहीत तोपर्यंत कंपनीच्या आणि संबंधित संचालकांच्या खात्यांतून कोणतीही रक्कम काढता येणार नाहीत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)