सुभाष घई यांच्यावरही बलात्काराचा आरोप 

मुंबई  – एका महिलेने नाव गोपनिय ठेवण्याच्या अटीवर दिग्दर्शक सुभाष घईंवर बलात्काराचा आरोप केला आहे. सुभाष घईंनी एका चित्रपटाच्या शूटींगवेळी नशेत आपल्यावर बलात्कार केला, अशी आपबीती तिने सांगितली आहे. गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी ते मला सोबत घेऊन जात. अनेकदा ते मला घरी सोडविण्यासाठी येत. तेव्हा ते माझ्या मांडीवर हात ठेवत. चांगले काम केल्याबद्दल अनेकदा ते मला मिठी मारत असत. त्यांच्या लोखंडवाला येथील घरी त्यांचे कुटुंबिय राहात नसत. त्यामुळे ते मला बोलवत. त्यावेळी ते माझ्याशी अतिशय असभ्य वर्तन करात. एकेदिवशी म्युजिक सेशन संपल्यानंतर त्यांनी मला हॉटेलवर नेले आणि अतिप्रसंग केला, असा आरोप या महिलेने केला आहे.
दरम्यान सुभाष घईंनी बलात्काराचा हा आरोप फेटाळून लावला आहे. असत्य वा अर्धसत्य जुन्या कहाण्या जगासमोर आणून कुठल्याही व्यक्तीला खलनायक बनवणे जणू फॅशन झाले आहे. हे आरोप मी अमान्य करतो. मी निश्‍चितपणे मानहानी खटला दाखल करणार, असे त्यांनी म्हटले आहे.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)