सुभाष घईंविरोधातील केट शर्माची “मी टू’ची तक्रार मागे 

आलोकनाथ यांच्याविरोधात “मी टू’च्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला आहे. तर दुसरीकडे चित्रपट निर्माते दिग्दर्शक सुभाष घई यांच्याविरोधात अभिनेत्री केट शर्माने दाखल केलेली अशीच तक्रार तिने मागे घेतली आहे. त्यासाठी केट शर्माने दिलेले स्पष्टिकरण फारच रंजक आहे.

लोकांनी “मी टू’अभियानाचा विनोद करायला सुरुवात केली आहे. कोणीही या अभियानाला फार सिरीयसली घेत नाही. सुभाष घई यांच्यावर आरोप केल्यानंतर तिला स्वतःला आणि तिच्या कुटुंबीयांना खूपच त्रास सहन करावा लागला. लोकांच्या प्रश्‍नांना सामोरे जाणे अवघड झाले. या तक्रारीबाबत पोलिसांच्या भूमिकेवरही केट शर्माने प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे.

-Ads-

आपल्याला आता सुभाष घई यांच्यावर कायदेशीर कारवाई वगैरे काहीही करायची नाही. स्वतःच्या आईच्या उपचारांवरच लक्ष केंद्रीत करायचे आहे, असे केट शर्माने म्हटले आहे. सुभाष घई यांनी बॉडी मसाज देण्याची विनंती वाढदिवसाच्या पार्टीमध्ये सर्वांसमक्ष केली होती. या मसाजनंतर घई यांनी आपल्याला एका खोलीत नेऊन किस करण्याचा प्रयत्न केला होता, असे केट शर्माने आपल्या तक्रारीमध्ये म्हटले होते. मात्र आता पोलिसांकडील ही तक्रार मागे घेण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)