सुभाषिताद्वारे मुख्यमंत्र्यांनी समजून सांगितले दळणवळणाचे महत्व

नवी दिल्ली: राजधानी दिल्ली येथे सुरु असलेल्या ‘नॅशनल मोबिलिटी समिट’च्या तिसऱ्या सत्राला आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केले. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल ‘नॅशनल मोबिलिटी समिट’चे उदघाटन करण्यात आले होते. या परिषदेमध्ये दळणवळणाचे भविष्य या विषयावर चर्चा सुरु आहे.

यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी एका सुभाषिताद्वारे दळणवळणाचे महत्व समजावून सांगितले. आस्ते भग आसीनस्य उर्ध्वम तिष्ठती तिष्ठत: चराती चरतो भग: चरैवेति चरैवेति।। म्हणजेच माणसाची ‘संपत्ती’ तो थांबल्यावर थांबते, तो झोपल्यावर झोपते व तो चालू लागल्यावर चालू लागते. त्यामुळे सतत चालत राहिले पाहिजे. असा संदेश त्यांनी दिला.

महाराष्ट्र दळणवळणाचे महत्व जाणून आहे त्यामुळेच राज्यभरामध्ये दळणवळणाच्या विकासासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. हायपरलुप, बुलेट ट्रेन यांसारख्या प्रकल्पांमधून दळणवळणाची गती वाढेल व त्यामुळे राज्याच्या विकासाला हातभार लागण्यास मदत होईल असे देखील ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)