सुब्रमण्यम स्वामी यांनी केले स्वागत

नवी दिल्ली – सरन्यायाधिशांच्या विरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळून लावण्याचा उपरराष्ट्रपती नायडू यांनी घेतलेल्या निर्णयाचे भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार डॉ सुब्रमण्यम स्वामी यांनी स्वागत केले आहे. ज्या दिवशी हा प्रस्ताव दाखल झाला त्याच दिवशी तो त्यांनी फेटाळयला हवा होता असेही त्यांनी म्हटले आहे.

या नोटीशीतला तपशील जाहीर करणे अयोग्य होते पण तो जाहीर करण्यात आला होता त्यामुळे ती नोटीसच स्वीकारयची गरज नव्हती असे त्यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. तथापी आज त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो स्वागतार्ह आहे असे ते म्हणाले. दरम्यान युपीए सरकाच्या काळात अतिरीक्‍त सॉलिसीटर जनरल म्हणून काम केलेले ऍडव्होकेट हरिन रावल यांनी मात्र या विषयावर कोणतीही प्रतिक्रीया देण्यास नकार दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)