सुबोध भावेंना साकारायचीय “जेआरडीं’ची भूमिका!

पिंपरी – आतापर्यंत चित्रपटात मला बालगंधर्व, लोकमान्य टिळक असो किंवा डॉ. काशीनाथ घाणेकर यांना पडद्यावर का होईना स्पर्श व संवाद साधता आला. या अर्थाने मला काही काळ वेगळे विश्व निर्माण करणाऱ्या अलौकिकांना जवळून जाणून घेता आले. जेआरडी टाटा यांची भूमिका जर करायला मिळाली तर माझ्यासारखा भाग्यवान मीच असेन, असे प्रतिपादन सिनेअभिनेते सुबोध भावे यांनी पिंपरी येथे व्यक्त केले.

टाटा मोटर्स कलासागरच्या 38 व्या दिवाळी अंकाचे प्रकाशन टाटा मोटर्स ट्रेनिंग डिव्हिजन हॉस्टेल, पिंपरी येथे सुबोध भावे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी टाटा मोटर्स एम्लॉईज युनियनचे सरचिटणीस उत्तम चौधरी, सुनील सवई, सरफराज मणेर, रवी कुलकर्णी, विनोद कुलकर्णी, मकरंद गांगल, अचित्य सिंग आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भावे पुढे म्हणाले, चित्रपटात काम करताना अनेक अनुभव आले. त्यातच चित्रपटासंबंधी चित्रपट निर्मात्यापासून ते स्पॉट बॉयपर्यंत प्रत्येक जण हा त्या चित्रपटाचा भाग असतो. डॉ.काशिनाथ घाणेकर ही भूमिका साकारणे सोपे नव्हते. माझे आणि त्यांचे विचारही पूर्ण वेगळे आहेत. बालगंधर्व, लोकमान्य टिळक आणि आता डॉ. काशीनाथ घाणेकर साकारताना विचारांशी कुठे तरी साम्य होते. आतापर्यंत या सर्वांची भूमिका करायला मिळाली हे माझे भाग्य समजतो. तसेच वसंत कानेटकर, पु. ल. देशपांडे, शांता शेळके, जगदीश खेबुडकर अशा नामवंत व्यक्तींच्यामध्ये माझी गणना थोर महान व्यक्ती म्हणून होऊ शकत नाही, असे त्यांनी नमूद केले. माझे एकच स्वप्न आहे की कधीतरी मला टाटा मोटर्सचा लोगो असलेला शर्ट घालून सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत तुमच्याबरोबर टाटा कंपनीत काम करायचं आहे. तुला पाहते रे मधील माझ्या भूमिकेमुळे 40 च्यातील लोकांचा कॉन्फीडन्स वाढला. समाजातही कॉन्फिडन्स वाढला आहे, असे सुबोध भावे म्हणताच श्रोत्यांमध्ये हास्याचा फवारा उठला.

यावेळी कलासागर दिवाळी अंकातील कथा, कविता स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. प्रास्ताविक वीरेंद्र वायाळ यांनी केले. सूत्रसंचालन प्रियंका बागल यांनी केले. तर आभार मयुरेश कुलकर्णी यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)