सुबोध जयस्वाल मुंबईचे नवे पोलिस आयुक्त

मुंबई : मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून 1985 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी सुबोध जयस्वाल यांच्या नावाची घोषणा झाली आहे. आज ते पदभार स्वीकारणार आहेत. तर राज्याच्या महासंचालकपदी दत्ता पडसलगीकर यांची वर्णी लागली आहे.

दुसरीकडे राज्याचे पोलिस महासंचालक सतीश माथूर आज सेवानिवृत्त झाले. यावेळी पोलिस दलामार्फत मोठ्या आदराने आणि दिमाखदार सोहळ्याने त्यांना निरोप देण्यात आला. फुलाने सजवलेल्या एका गाडीतून माथूर यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पोलिसांच्या बँड पथकाने वादनही केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कोण आहेत सुबोध जयस्वाल?

* सुबोध जयस्वाल हे 1985 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
* ते सध्या भारतीय गुप्तचर यंत्रणा ‘रॉ’मध्ये वरिष्ठ पदावर आहेत.
* सुबोध जयस्वाल हे तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळ्याचे तपास अधिकारी होते.
* सोबतच महाराष्ट्राच्या नक्षलग्रस्त परिसरात त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला होता.
* 2006 मुंबई बॉम्बस्फोटाच्या तपास पथकात होते.
* तसंच मुंबई पोलिसात अतिरिक्त पोलिस आयुक्त म्हणूनही त्यांन काम केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)