सुप्रीम कोर्टाने सरकारचे आदेश रद्द केले ; आलोक वर्मा पुन्हा सीबीआयच्या प्रमुखपदी

राजस्थान – सीबीआयमध्ये लाचखोरीचे प्रकरण उघडीस आल्यापासून एकच खळबळ उडाली आहे. सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना आणि सीबीआय प्रमुख आलोक वर्मा यांच्यावर लाच घेतल्याचे आरोप आहेत. यानंतर दोन्हीही अधिकाऱ्यांना सक्तीच्या सुट्टीवर पाठविण्यात आले होते. केंद्र सरकारचा या आदेशाला सुप्रीम कोर्टाने रद्द केले  आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे कि, सुप्रीम कोर्टात याप्रकरणी मंगळवारी सुनावणी झाली. यावेळी, सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना हटविण्याआधी निवड समितीची परवानगी घ्यायला हवी होती. ज्या पद्धतीने सीव्हीसीने आलोक वर्मा यांना हटविले, ते संविधानाच्या विरोधात आहे, असे सांगत सुप्रीम कोर्टाने आलोक वर्मांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा आदेश रद्द केला. यापूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजस्थानातील हटायूमध्ये सभेत आलोक वर्मांनी राफेल करारातील घोटाळ्याला विरोध केला म्हणून त्यांना सरकारने सक्तीच्या सुट्टीवर पाठवले असल्याचा आरोप केला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)