सुप्रिया सुळे यांच्याकडून भरीव विकासकामे

सुनील चांदेरे : कोंढुरमध्ये रस्त्याचे उद्‌घाटन

पिरंगुट- खासदार सुप्रिया सुळे यांनी कोंढुर गावाच्या पदरात विकासकामांच्या व प्रतिनिधीत्वाचे भरभरून माप टाकले आहे. आजच्या भाऊबीजेच्या मुहुर्तावर सुप्रिया सुळे यांना मतदानरूपी ओवाळणी त्याच पद्धतीने देण्याचा कोंढुरवासीयांनी संकल्प करण्याचे आवाहन भोर विधानसभा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष सुनील चांदेरे यांनी केले. कोंढुर (ता.मुळशी) येथील अंतर्गत रस्ता उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा प्रा. सविता दगडे होत्या.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे, पंचायत समिती सदस्या राधिका कोंढरे, सरचिटणीस माऊली कांबळे, सरपंच सुजाता शिंदे, उपसरपंच सारिका कुडले, माजी सरपंच शंकर मरगळे, ग्रामविकास अधिकारी खुडे, ज्येष्ठ नेते किसन दिघे, अनिल चांदेरे, सुखदेव चांदेरे, किसन ताकवले, उमेश शिंदे, उमेश धोत्रे, काशिनाथ मोरे, उज्ज्वला हाळंदे आदी उपस्थित होते. प्रा. सविता दगडे म्हणाल्या, भविष्यकाळात राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच सरकार येणार असल्याने विकासकामांची चिंता करण्याची गरज नाही. लोकसभा व विधानसभा निवडणुकांनतर संपूर्ण राज्याचे व देशाचे चित्र बदलणार आहे. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली देशाची घडी सुरळीत बसवली जाईल. तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे यांनी गावात केलेल्या विकासकामांचा आढावा यानिमित्ताने मांडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयवंत दिघे यांनी केले. किसन दिघे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)