सुप्रिया सुळे म्हणतात, त्या तर अफवाच

पंढरपूर -राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या खासदारकन्या सुप्रिया सुळे यांनीही पक्षाच्या एनडीए सरकारमधील सहभागाबाबतच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. सुप्रिया यांनाच केंद्रीय मंत्री बनवले जाण्याची शक्‍यताही वर्तवली जात आहे. याबाबतच्या चर्चांवर त्यांनी येथे प्रतिक्रिया दिली.

मोदी मंत्रिमंडळात शपथ घेणार असल्याच्या अफवा उठवल्या जात आहेत. त्यात कोणतेही तथ्य नाही. मागील तीन वर्षांपासून अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत. त्या कोण पसरवतं ते कळत नाही, असे त्या म्हणाल्या. देशात मोदी सरकारच्या विरोधात फळी तयार होत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. त्यासाठी त्यांनी राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी रविवारी पाटण्यात आयोजित केलेल्या सभेला विरोधी पक्षांचे अनेक नेते उपस्थित राहिल्याचा संदर्भ दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)