सुप्रभात : “सांग दर्पणा’

मी कशाला आरशात पाहू गं..’ असं म्हणत “आपण रूपाची राणी’ असल्याचं बहुतेक महिला म्हणत असल्या, तरी प्रत्यक्षात त्या आपल्या दिसण्याबद्दल प्रचंड जागृक असतात. म्हणूनच संधी मिळेल तेव्हा त्या आरशात पाहून चेहरा ठिकठाक आहे की नाही हे पाहत असतात. खरं तर ही स्त्री सुलभ प्रवृत्ती आहे. त्यामुळे ती जगभरातील स्त्रियांत आढळते. ब्रिटिश महिला काही याला अपवाद नाहीत.

आपल्या दिसण्याबद्दल इंग्लिश महिला कमालीच्या संवेदनशील असल्याचे याबाबत अलिकडेच झालेल्या पाहणीत आढळलं आहे. मिळेल तिथं आपला चेहरा न्याहाळण्याची तेथील स्त्रियांना जणू सवयच आहे. दुकानांतील आरशांत, विंडो शॉपिंग करताना तेथील काचेत, मोटारींच्या आरशात आणि चक्क समोरच्या व्यक्तीच्या सनग्लासेसमध्ये स्वत:चं प्रतिबिंब त्या पाहतात, असं या पाहणीनं म्हटलं आहे.

रस्त्यानं चालत जात असताना कडेला उभ्या असलेल्या मोटारीच्या काचेत वाकून स्वत:चा चेहरा पाहत असल्याचं दहापैकी एका महिलेनं या पाहणीत कबूल केलं आहे. स्वत:जवळ आरसा ठेवत असल्याचे टक्के महिलांनी मान्य केलयं आणि चेहऱ्यावरील मेकअप्‌ पाहण्यासाठी अधून-मधून वॉशरूममध्ये चकरा मारत असल्याचंही बहुतेकींनी सांगितले आहे. एका खासगी कंपनीने या पाहणीसाठी दोन हजार महिलांशी संवाद साधला. गमतीचा भाग म्हणजे काहींनी आपला खास आरसा असल्याचे सांगितले. या आरशात म्हणे त्या फारच सुंदर दिसत असल्याचे त्यांना वाटतं!

‘प्रत्येक महिला ही सुंदर दिसण्याचाच प्रयत्न करीत असते. त्यामुळे त्यांचे आरशात पाहणे अस्वाभाविक नाही. आपण सुंदर आहोत ही भावना निर्माण झाली, की त्यांचा आत्मविश्वासही वाढतो…’ या मॅंचेस्टर विद्यापीठातील डॉ. ख्रिस्तीन बंडी यांच्या विश्‍लेषणाशी बहुतेक महिला सहमत होतीलच; कारण आरशात पाहून त्या नेहमीच विचारत असतात, “सांग दर्पणा कशी मी दिसते?’


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)