सुपे येथे विविध विकासकामांचे उद्‌घाटन

सुपे- बारामती तालुक्‍यातील सुपे येथे विविध विकास कामांचे उद्‌घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वास देवकाते यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने गावामध्ये मोठी अभ्यासिका इमारत, साठेनगर व रोहिदास नगर या भागात सिमेंट क्रॉक्रेट रस्ता तसेच कलार आळी येथील साईबाबा मंदिराला संरक्षण भिंत आदी कामांचे उद्‌घाटन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, बारामती पंचायत समितीच्या उपसभापती शारदा खराडे, जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे, पंचायत समिती सदस्या निता बारवकर, बारामती मार्केट कमिटी संचालक शौकत कोतवाल, पंचायत समिती उपअभियंता कोकणे, माजी जिल्हा परिषद सदस्य बी. के. हिरवे, माजी पंचायत समिती सभापती पोपटराव पानसरे, माजी बाजार कमिटी संचालक संपतराव जगताप, सरपंच दादा पाटील कुतवळ, उपसरपंच शफीकभाई बागवान, ग्रामपंचायत सदस्य संजय बारवकर, संपतराव काटे, नंदा खैरे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
सुपे गावात सुमारे 27 लाख रूपये खर्च करून अभ्यासिका इमारत बांधण्यात येणार आहे. सुमारे 1500 स्वेअर फुट आकाराच्या या इमारतीमध्ये ग्रंथालय असून मुलांना आणि मुलींना अभ्यास करण्यासाठी दोन स्वतंत्र कक्ष असणार आहेत. व मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधण्यात येणार आहेत. सिमेंट रस्त्यांसाठी 9 लाख रूपये व साईबाबा मंदिर संरक्षण भिंतीसाठी 3 लाख रुपये निधी खर्च करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक लोणकर यांनी केले. दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच सुपे परगाण्यात आलेले विश्‍वास देवकाते यांचा सत्कार राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस सुपे शाखेच्या वतीने करण्यात आला.
सुपेत गेस्ट हाऊस व हॉल बांधणार
सुपे गावातील जिल्हा परिषदेच्या सात एकर जागेत गेस्ट हाऊस व ग्रामपंचायतीच्या मिटिंग व कार्यक्रमासाठी मोठा हॉल बांधण्याच्या सूचना जिल्हा परिषद अध्यक्षांनी पंचायत समिती उपअभियंता कोकणे यांना दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)