सुपारीच्या दरात 130 रुपयांची वाढ

पिंपरी – केरळमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा परिणाम मसाल्यासह सुपारीवर देखील पडला असल्याने पांढऱ्या सुपारीची आवक घटली आहे. त्यामुळे तिचे दर प्रति किलो 130 रूपयांनी वाढले आहेत, अशी माहिती मसाला विक्रेता इरफान अत्तार यांनी दिली.

संपूर्ण भारत भर सुपारीची मागणी मोठ्या प्रमाणात होते. तिचा उपयोग धार्मिक कामामध्ये सुद्धा केला जातो. खास करून लग्न सोहळ्याच्या प्रसंगी सुद्धा तिला मोठ्या प्रमाणात मागणी मागणी असते. तसेच
महाराष्ट्रात आणि उत्तर प्रदेशामध्ये पानांचे जास्त शौकीन असल्यामुळे या दोन राज्यात सुपारीची जास्त प्रमाणात आवक होते. त्याला मागणी त्याच प्रकारची असते. तसेच नागपूरमध्ये देखील सुपारीची मागणी मोठ्या प्रमाणात होते. मात्र, केरळमध्ये अतिवृष्टी झाल्याने सुपारीचे काही गोदाम उद्धवस्त झाल्याने तिचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे सुपारीचे दर वधारले आहेत.

-Ads-

गेल्या काही वर्षापासून सुपारीचे दर स्थिर होते. त्यात वाढ झाली तरी पाच किंवा दहा रूपयाच्यावर झाली नाही. यामुळे नागरिकांना तिचे दर वाढले तरी त्याचा फटका बसला नाही. मात्र, यावेळी सुपारीने सर्वच नोंदी तोडल्या आहेत. तिची आवक घटल्यामुळे सुपारीचे किलोमागे 130 रूपये दर झाले आहे. घाऊक बाजारत अतिवृष्टी होण्याच्या पूर्वी 270 रूपये किलो तिचा दर होता. आता 380 रूपये किलो पर्यंत गेला आहे. तर किरकोळमध्ये सुपारी 400 रूपये किलोने विकली जात आहे. पांढऱ्या सुपारीची आवक मोठ्या प्रमाणात केरळमधून होते. तसेच कर्नाटक आणि महाराष्ट्रातील सिंधूदूर्ग येथूनही सुपारीची आवक होते, असे आत्तार यांनी सांगितले.

खाण्याचे पानही महागणार
सुपारीचे दर एवढ्या वर्षात पहिल्यांदाच वाढले आहेत. यामुळे एवढी महाग सुपारी परवडणारी नसल्यामुळे खाण्याचे पान बनविण्याचे प्रमाण कमी केले आहे. जे नियमित येणारे ग्राहक आहेत. त्यांनाच पान देत आहोत. पाच दहा रूपयांची वाढ समजू शकतो. 400 रूपये किलो सुपारीचा दर झाल्याने तो परवडणारा नाही. यामुळे येत्या काही दिवसांत खाण्याच्या पानांचे भाव वाढण्याची शक्‍यता असल्याचे विक्रेता के. राजन यांनी वर्तवली.

सुपारीची आवक कमी असल्यामुळे तिचे दर वाढले आहेत. हे दर पहिल्यांदाच एवढे वाढल्यामुळे सुपारीची मागणी कमी झाली आहे. नागरिकांना दर सांगितल्यावर त्यांचा विश्‍वास बसत नाही. यामुळे वाद-विवाद देखील होत आहेत. दर वाढल्याने नागरीक गरजेपुरती सुपारी घेऊन जात आहेत. येत्या काही दिवसांत आवक न वाढल्यास दर आणखी वाढण्याची शक्‍यता आहे.
– इरफान अत्तार, विक्रेता, पिंपरी.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)