सुपर शेअर : वायदे बाजारातील निफ्टी

बँक ऑफ बडोदा, विजया बँक व देना बँक या तीन बँकांच्या एकत्रीकरणाच्या बातमीनं देना बँकेचा शेअर चांगलाच वधारला. ११% पर्यंत घसरलेली अनुत्पादित मालमत्ता (NPAs) असणारी देना बँक या तिन्ही बँकांमध्ये जास्त लाभदायी ठरेल असं वाटल्यानं देना बँकेच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाल्यामुळं हा शेअर बातमीच्या दुसऱ्याच दिवशी सुमारे २० % वाढला.

गेल्या आठवड्यात वायदा बाजारात फार मोठी संधी उपलब्ध होती. गेल्या शुक्रवारी सेन्सेक्सनं तब्बल १५०० अंशांची वध-घट अनुभवली. तर निफ्टी ५० नं ४८० अंशांचे उतारचढाव एकाच दिवसात पहिले. बारकाईनं नजर ठेवल्यास निफ्टी फ्युचरनं १० सप्टेंबर रोजीच, आपल्या ५/२० चलत सरासरीनुसार ११४९२ किंमतीवर निगेटिव्ह क्रॉसओव्हर दिलेला आहे व मागील आठवड्याच्या शेवटच्या दिवशी निफ्टी फ्युचर्सचा भाव ११००५ पर्यंत खाली आला. त्यामुळं अशा शॉर्ट सेलिंगद्वारे देखील नफा कमावता आला असता. त्यामुळ वायदे बाजारातील निफ्टी ही मागील आठवड्याचा सुपर शेअर ठरली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)