सुपर शेअर – जेट एअरवेज

मागील आठवड्यातील सुपर शेअर होता जेट एअरवेज. वाढलेल्या कर्जाचा बोजा, कर्मचाऱ्यांचे थकलेले पगार, इंधनाच्या वाढीव किमती व क्षेत्रातील तीव्र स्पर्धा यामुळे प्रवासी तिकिटांच्या न वाढवता येणाऱ्या किंमती, या सर्व गोष्टींमुळे डबघाईस आलेल्या कंपनीला टाटा ग्रुपनं हात द्यायची बोलणी सुरु झाल्यानंतर हा शेअर मागील आठवड्यात २५७ रुपयांवरून ३४६ रुपयांवर पोहोचला, सुमारे ३५% वाढ. अशा या वाढीची कुणकुण दैनंदिन आलेखावर १९ ऑक्टोबर रोजीच लागली होती. ५ व २० दिवसांच्या चलत सरासरीनं २१२ रुपयांवर त्याने पॉझिटिव्ह ब्रेक आऊट दिलं होतं. तर एमएसीडीनं १० ऑक्टोबर रोजी १८९ रुपयांवरच पॉझिटिव्ह ब्रेक आऊट दिलेलं होतं.

निफ्टी ५० नं १०६००-१०६५० च्या दरम्यानची कोंडी फोडण्यात यश मिळवलं असून आता यापुढं १०७२० व १०८५० या पातळ्यांवर अडथळे संभवतात तर खालील बाजूस १०४५० हीआधार पातळी असू शकते. या आठवड्यासाठी रिलायन्स, कोटक बँक, बजाज फायनान्स, आयडिया, इंडिया सिमेंट्स, उज्जीवन आदी कंपन्या विशेष वाटत आहेत.

उत्तम आर्थिक निकाल जाहीर केलेल्या अशा कंपन्या, ज्यांत पुढील एका वर्षासाठी गुंतवणूक केली जाऊ शकते.

१.  एसआरएफ लि

२.  विशाखा इंडस्ट्रीज लि

३.  सिटी युनियन बँक

४.  पराग मिल्क्स फूड लि

५. आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लि

६.  फिलिप्स कार्बन ब्लँक लि

७.  एसएच केळकर अँड कंपनी लि

८.  हेरीटेज फूड लि

९.  श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लि

१०.  पीएसपीप्रोजेक्ट्स लि


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)