सुपर शेअर एचडीबी फायनॅन्शिअल सर्व्हिसेस

एचडीबी फायनॅन्शिअल सर्व्हिसेस ह्या बाजारात नोंदणी न झालेल्या कंपनीचा शेअर मागील दीड वर्षात सुमारे तिप्पट वाढलाय. त्याचे कारण आहे मूळ पालक कंपनी असलेली एचडीएफसी बॅंक. एकूणच एचडीएफसी बॅंकेबद्दल गुंतवणूकदारांचं व परकीय गुंतवणूकदारांचं प्रेम हे सर्वश्रुत आहेच. याचं कारण म्हणजे या ग्रुपचं ब्रॅंडनेम, त्यांचं बाजारातील गुडविल, जबरदस्त अॅसेट क्वॉलिटी, उत्तम व्यवस्थापन व जबरदस्त नफा. या सर्वांमुळं एचडीएफसी एएमसीच्या शेअरनं देखील जबरदस्त वाढ नोंदवलीय. आता या ग्रुपमधील अजून दोन कंपन्या बाजारात नोंदणी व्हायच्या बाकी आहेत, त्या म्हणजे एचडीबी फायनान्शिअल सर्व्हिसेस व एचडीएफसी सिक्‍युरिटीज.

ही NBFC प्रकारातील कंपनी असून वैयक्तिक कर्ज, व्यापार कर्ज, गृहपयोगी वस्तूंसाठी कर्ज, मालमत्तेवर कर्ज, व्यवसायिक वाहनांसाठी, बांधकाम साहित्य खरेदीसाठी, सोने तारण व वाहन कर्ज इ. प्रकाराद्वारे ती कर्ज वाटपासाठी अग्रेसर आहे. या कंपनीस क्रिसिल व केअर यांचं मानांकन आहे. कंपनीच्या 22 राज्यांत व 3 केंद्रशासित प्रदेशांसह भारतभर एकूण 1000 शाखा आहेत.

दीड दोन वर्षांपूर्वी 350-400 रुपयांच्या दरम्यान असणारा ह्या शेअरचा भाव HDFC MC ला मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळं सध्या 1100 रुपयांच्या वरती व्यवहार करत आहे. HDFC Bank या कंपनीची प्रमुख प्रवर्तक आहे व तिच्याकडं सुमारे 96% शेअर्स आहेत. मागील मार्च 2018 अखेरीस कंपनीचा नफा हा 1464 कोटी रुपयांवर पोहोचलाय, तर उत्पन्न 7062 कोटी रुपये आहे. अशा या कंपनीसाठी असलेली मागणी याचे भाव वाढवतच आहे. आता प्रश्‍न आहे की अशा शेअर्सचे व्यवहार कसे होतात, तर एखाद्या गुंतवणूक सल्लागारामार्फत या शेअर्समध्ये व्यवहार होऊ शकतात जे पूर्ण पारदर्शक व कायदेशीर असतात. मात्र, बाजारात नोंदणी झाल्यावर असे आयपीओच्या आधी घेतलेले शेअर्स हे एक वर्षभर विकता येत नाहीत (लॉक-इन). अशी ही कऊइ पाहुया कधी लिस्ट होतेय ते. मात्र, अशा सुवर्णसंधी बाजारात सहजासहजी मिळत नाहीत तर त्या शोधाव्या लागतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
3 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)