सुपर शेअर : अदानी इंटरप्रायझेस

मागील आठवड्याचा सुपर शेअर होता अदानी एंटरप्रायझेस. हा शेअर मागील एका आठवड्यात १४३.८५ वरून १७० रुपयांवरती पोहोचला. १४ ऑक्टोबर रोजी आलेल्या बातमीनं ह्या कंपनीचा शेअर चर्चेत आला की जगातील पहिल्या सात मोठ्या तेल व वायू कंपन्यांमध्ये गणली जाणारी फ्रान्सची मोठी कंपनी टोटल ही अदानी समूहातील लिक्विफाइड नॅचरल गॅस (LNG)मध्ये पन्नास टक्क्यांपर्यंत भागीदारी करू शकते. जरी ही बातमी मागील आठवड्यात जाहीर झाली तरी दैनिक आलेखावर एमएसीडीच्या अभ्यासानुसार २७ सप्टेंबर रोजीच ह्या शेअरच्या खरेदीस १४२ रुपयांवर अनुकूलता दर्शवली होती.

त्याचप्रमाणे या आठवड्यात अदानी पोर्ट्स, अंबुजा सिमेंट्स, एशियन पेंट्स, बजाज ऑटो, बजाज फायनान्स, बायोकॉन, भारती एअरटेल, कॅनफिन होम्स, डॉ.रेड्डीज, ग्लॅक्सोस्मिथलाईन फार्मा, एचसीएल टेक, आयसीआयसीआय बँक, आयटीसी, कोटकबँक, मारुती, विप्रो, येस बँक इ. कंपन्यांच्या शेअर्सवर लक्ष ठेवल्यास चांगली संधी प्राप्त होऊ शकते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)