सुपर व्हिजन’अंतर्गत “रिस्ट्रक्‍चर’ला विरोध

पिंपरी- 1.3 टक्के “सुपर व्हिजन’ योजनेत महावितरण “रिस्ट्रक्‍चर’ करू पाहत आहे. त्यामुळे छोट्या ठेकेदारांवर संक्रांत येईल, त्यांना कामे मिळणे अवघड होईल तसेच यामुळे फक्‍त बड्या ठेकेदारांची चलती राहील, अशी तक्रारी पिंपरी चिंचवड इलेक्‍ट्रिकल कॉन्ट्रॅक्‍टर्स असोसिएशनच्या शिष्टमंडळाने महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक तथा अध्यक्ष संजीव कुमार यांची मुंबई येथे भेट घेत केली.

यावेळी संजीवकुमार यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. महावितरणने जी ऑनलाईन प्रक्रिया सुरु केली आहे त्यावर बैठकीत समाधान व्यक्त केले. या ऑनलाईन प्रक्रियेचा वेग मंदावल्याने वीज ग्राहकांना नाहक त्रास होतो, याविषयी मत व्यक्‍त केले. तसेच या प्रक्रियेतील त्रुटींबाबत साधक-बाधक चर्चा झाली. यावेळी व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी ही प्रक्रिया येत्या वर्षात आणखी चांगल्या प्रकारे काम करेल, असे आश्‍वासन दिले.
“सुपर व्हिजन’ योजनेंअतर्गत महावितरण “रिस्ट्रक्‍चर’ करू पाहत आहे. त्यामुळे छोट्या ठेकेदारांवर संक्रांत येईल ही भीती निरर्थक असल्याचे संजीव कुमार यांनी सांगितले. तसेच यामध्ये सर्व ठेकेदारांना सामावून घेतले जाईल, असे आश्‍वासन यावेळी दिले. या बैठकीत पुणे जिल्ह्यात वीज मीटर्सच्या तुटवड्याबाबत पदाधिकाऱ्यांनी विचारणा केली असता आधी तुटवडा होता आता मात्र मीटर्स आलेले आहेत, अशी माहिती देण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष संतोष सौंदणकर यांच्या मे. न्यू सिमरन इंटरप्रयाझेस या फर्मला महावितरण कंपनीचे पुणे मुख्य अभियंता यांनी लायसन्स रद्द करून कामबंदी आदेश लागू केला. त्याबाबत पदाधिकाऱ्यांनी व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांना लेखी निवेदन देत सदर प्रकरणी विचारले असता, त्यांनी संतोष सौंदणकर यांचे लायसन्स पुनर्बहाल करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून तात्काळ सूचना दिल्या.
यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष संतोष सौंदणकर, सचिव नितीन बोंडे, उपाध्यक्ष, जावेद मुजावर, उपाध्यक्ष मनोज हरपळे, आकाश भराटे, प्रदीप बेळगांवकर आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)