सुपरहिरोंचे जनक ‘स्टॅन’ ली यांचे निधन

हॉलिवूड चित्रपटामध्ये  स्पायडर मॅन आणि  हल्क सुपरहिरोंचे जन्मदाते स्टेन लीयांचे आज लॉस एंजल्स येथे निधन झाले.

स्टेन ली कॉमिक्स जगताचे महानायक, मार्वल कॉमिक्सचे माजी संपादक होते. कॉमिक्स लेखक, संपादक, चित्रपट निर्माता, अभिनेता आणि प्रकाशक होते. स्टेन लीमुळे  स्पायडर मॅन, हल्क, एक्स मॅन, आयरन मॅन, ब्लॅक पँथर, कॅप्टन अमेरिका, अँट मॅन हे सुपरहिरो अवघ्या जगाला मिळाले.

ली यांनी भारतात चित्रपट निर्मितीचे ‘चक्र’ या सुपरहिरो फिल्मच्या निमित्ताने काम केले. चक्र हा अॅनिमेशन चित्रपट होता. कार्टून नेटवर्क, ग्राफिक इंडिया तथा पाओ इंटरनॅशनलने संयुक्तपणे तो साकारला होता.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
4 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)