सुपरसॉनिक “ब्रह्मोस’ची यशस्वी चाचणी

राजस्थानातील पोखरण येथून केले प्रक्षेपण
पोखरण (राजस्थान) – जगातील सर्वाधिक वेगवान समजल्या जाणाऱ्या आणि आवाजाच्या वेगापेक्षा अधिक वेगवान असलेल्या सुपरसॉनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्राची भारताकडून गुरुवारी यशस्वी चाचणी करण्यात आली. ही चाचणी राजस्थानातील पोखरण येथील तळावरुन गुरुवारी पहाटे पार पडली.

या क्षेपणास्त्राची भारत आणि रशिया यांनी संयुक्तरित्या जून 2001मध्ये निर्मिती केली आहे. भारतातील ब्रह्मपुत्रा नदी आणि रशियातील मस्कवा नदी यांच्यावरुन याचे नाव ब्रह्मोस असे ठेवण्यात आले. या क्षेपणास्त्राचा वेग आवाजाच्या गतीपेक्षा तीनपट अधिक आहे. 290 किमी पर्यंत मारा करु शकण्याची, तर 300 किग्रॅ वजनाची स्फोटके वाहून नेण्याची याची क्षमता आहे.

हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या ब्रह्मोसला पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांना टार्गेट करण्यासाठीही वापरता येणे शक्‍य आहे. जमिनीखालील बंकर्स, कन्ट्रोल सेंटर्स आणि समुद्रावरून उडणाऱ्या विमानांनाही क्षणात उद्‌ध्वस्त करण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)