सुपरशेअर : गृह फायनान्स

मागील आठवड्यात शेवटी अमेरिकी फेडरल रिझर्व बँकेनं व्याजदरात केलेली वाढ व पुढील वाढीविषयीचं भाष्य आणि त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये आलेली मरगळ आपल्या बाजारातील पडझडीला कारणीभूत ठरली. त्यातच रिझर्व बँक सरकारशी विचारविनिमय करून बाह्य व्यावसायिक कर्जाच्या शिल्लक साठ्याबाबत मर्यादा घालण्याच्या बातमीनं व शेवटच्या सत्रात घसरलेल्या रुपयामुळं बाजारानं खालची दिशा पकडली. निफ्टी ५० साठी १०७५० व १०५०० ह्या आधार पातळ्या असून वरील बाजूस ११००० व ११०९० हे अडथळे संभावतात.

मागील आठवड्यातील सुपरशेअर होता गृह फायनान्स. एका आठवड्यात या शेअरनं ४ % वाढ नोंदवली. ७ डिसेंबर रोजी दैनिक आलेखावर एमएसीडी अभ्यासानुसार हा शेअर २९५ रुपयांवर खरेदीस सुचवला होता. मागील आठवड्याचा बंद भाव रु. ३३०.०५  होता. पुढील आठवड्यासाठी एमएसीडी अभ्यासानुसार टाटामोटर्स डीव्हीआर ९६ रुपयांवर (स्टॉपलॉस ९०) व आयसीआयसीआय प्रुडेन्शिअलचा शेअर ३०७ च्या वर (स्टॉप लॉस ३०३) खरेदी सुचवत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)