सुपरशेअर : केआरबीएल

मागील आठवड्यातील सुपर शेअर होता केआरबीएल. ही कंपनी आजच्या घडीची बासमती तांदळाची सर्वात मोठी निर्यातदार कंपनी आहे. इंडिया गेट या प्रमुख ब्रँडनं ही कंपनी परिचित आहे. मागील आठवड्यात ह्या कंपनीचा शेअर १६.६० टक्के वाढला. आपल्या नेहमीच्याच एमएसीडी दैनिक आलेखावर या शेअरनं १४ डिसेंबर रोजीच २८७ रुपयास पॉझिटिव्ह ब्रेकआऊट दिलेलं होतं. मागील आठवड्याचा बंद भाव होता ३२६.१५.

निफ्टीची वाटचाल : एकूणच मागील आठवड्यात मार्केट हे मरगळलेल्या अवस्थेत आढळलं. कोणतीही मोठी हालचाल न करता निफ्टीनं जेमतेम २० अंशांची वाढ नोंदवली परंतु दैनिक आलेखावर नजर टाकल्यास ही वादळापूर्वीची शांतता वाटते. निफ्टी ५० जर १०८७० या पातळीच्या वर बंद झाल्यास तिची धाव ११००० पातळीपर्यंत असू शकते, त्याचप्रमाणं खालील बाजूस १०८०० ची पातळी बंद भावानं तोडल्यास  १०६५० पातळीवर आधार संभवतो. एकूणच हा आठवडा मोठ्या वधघटीचा असू शकतो.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)