सुपरशेअर : आरईसी

मागील आठवड्याचा सुपरशेअर होता आरईसी इंडिया. सरकारनं या कंपनीतील आपला हिस्सा पीएफसी या कंपनीस विक्री करण्यास अनुमती दर्शवल्यानंतर ह्या शेअरने तेजी पकडली होती, त्यातच 17 डिसेंबर रोजी 105.65 रुपयांवर एमएसीडी या तांत्रिकी अभ्यासानुसार ब्रेक आऊट दिलेलं होतं.

मागील आठवड्यात हा शेअर लार्ज कॅप कंपन्यांच्या यादीत 11.5 % वाढ नोंदवून अग्रस्थानी विराजमान झाला होता. शुक्रवारचा बंद 122. पुढील कालावधीसाठी जेट एअरवेज, एनबीसीसी, आयटीसी, सनटीव्ही, सिमेन्स आदी कंपन्या लघुत्तम कालावधीसाठी एमएसीडी आलेखावर खरेदीस पूरक वाटतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मागील आठवड्यातील पहिल्या दोन सत्रात आपटी खाल्ल्यानंतर बाजारानं पुन्हा उर्ध्व दिशेस वाटचाल सुरु केलेली आहे. निफ्टी 50 या आठवड्यात 10535 या नीचांकावरून उसळून 10859.9 ला बंद आली. दैनिक आलेखावर निफ्टी 50 एका ऍसेंडिंग चॅनल दरम्यान वाटचाल चालू आहे. त्या दृष्टीनं 11100 हे पुढील उद्दिष्ट असू शकतं परंतु 10700 च्या खाली निफ्टी 50 राहिल्यास पुन्हा 10500 – 10550 हे उद्दिष्ट असू शकतं. उद्या जाहीर होणारे वाहन कंपन्यांचे विक्रीचे आकडे व पुढील आठवड्यापासून सुरु होणाऱ्या तिसऱ्या तिमाही निकालांची आकडेवारी बाजाराचा रोख ठरवेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)