सुनेच्या माहेरच्यांनी केलेल्या मारहाणीत सासऱ्याचा मृत्यू

पिंपरी – सुन नांदत नाही यातून झालेल्या वादात सुनेच्या घरच्यांनी सासऱ्याला मारहाण केली, यामध्ये सासऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रावेत येथे ही धक्‍कादायक घटना घडली आहे.

दिनकर देसाई असे या मारहाणीत मृत्यू झालेल्या सासऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या पत्नी इंदिरा दिनकर देसाई (वय-60, रा. रावेत) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार देसाई यांची सून प्रियंका, तिचे वडील संजय बभुतराव, चुलते व इतर सात जणांविरोधात (सर्व रा. देवपुर, धुळे) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका ही भांडणे करुन 25 मार्च 2018 रोजी माहेरी निघून गेली होती. तिला घेऊन तिचे वडील संजय सोनवणे हे 2 सप्टेंबर 2018 रोजी रावेत येथे देसाईंच्या घरी आले व त्यांनी मुलीला का नांदवत नाही म्हणत भांडणास सुरुवात केली.

दिनकर देसाई यांना संजय बभुतराव लाथा-बुक्‍क्‍याने मारहाण करीत त्यांना लोखंडी सोफ्यावर ढकलून दिले. यामध्ये त्यांच्या डोक्‍याला अंतर्गत दुखापत झाली व ते बेशुद्ध पडले. त्यांना चिंचवड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा 15 सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी शुक्रवारी (दि. 4) निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)